नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 

१) सर्वसामान्य जनतेला एकत्र आणून त्यांच्यामध्ये सामाजिक ऐक्याची, समानतेची बंधुत्वाची राष्ट्रीय एकात्मतेची भावना  जागृत करणे.

२) छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास तळागाळातील शिवभक्तां पर्यंत पोहोचवणे व त्यासाठी स्वतंत्र वाचनालये स्थापण करणे.

३) दुर्गयात्रा, दुर्ग स्वच्छता अभियान,  छञपती शिवाजी महाराजांचा भव्य पालखी सोहळा, जयंती, सोहळे, हिंदूंचे राष्ट्रीय सण आयोजित करुन ऐतिहासिक वारसा जपणे.

४) ऐतिहासिक प्रदर्शने भरवून समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पर्यायाने मराठयांचा इतिहास जनमानसात जागृत  ठेवणे व ऐतिहासिक धरोहर जपणे.

५) इतिहासावरील जास्तीत जास्त पुस्तके ग्रंथ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे.

६) धर्मजागृतेची भावना सर्व सामान्य लोकांना करुन देणे.

७) चौकाचौकात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची नेहमी स्वच्छता आणि निगा राखणे.

८) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेची आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्म व स्वराज्याप्रती केलेल्या बलिदानाची जाणीव विविध उपक्रमांतगत व इतिहासतज्ञांच्या साक्षीने  समाज मनापर्यंत पोहोचविणे.

९) सामाजिक शैक्षणिक,  औद्योगिक कला, क्रिडा क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी केल्याबद्दल संबंधित कर्तबगार नागरिकांचा सत्कार करणे.

१०) शिक्षणाचा प्रसार करणे त्यासाठी शैक्षणिक दृष्टया गोर गरीबांच्या मुलांसाठी अंगणवाडी,  बालवाडी, प्राथमिक शाळा,  माध्यमिक महाविद्यालये, मेडिकल कॉलेज,  इंजिनिअरींग कॉलेज, बोडींग हायस्कूल, मुला- मुलींचे स्वतंत्र वस्तीगृह, अनाथाश्रम, विधवाश्रम, अपंग व मुकबधीर विद्यालये स्थापना करणे तसेच विविध प्रकारची
शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे,

११) गोरगरीब विद्यार्थी / विद्यार्थ्यांना व अनाथ / अपंग लोकांसाठी  तसेच गोर- गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे.  त्यांना शालेय साहित्य गणवेश,  पुस्तके इत्यादी व शिष्यवृत्या देणे व गुणवंत विद्यार्थ्यासाठी पारितोषिके देणे.

१२) विद्यार्थी / विद्यार्थ्यांना संगणकाचे महत्व पटवून सांगणे व संगणकाचे विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग सुरू करून व त्यांना स्वावलंबी बनविणे.

१३) कलेद्वारे विविध प्रकारे सामाजिक समस्यांचे महत्व पटवून देणे व कलेची जोपासना करणे, त्यासाठी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे, स्टेज शो नाटक, आर्केस्ट्रा इ. आयोजित त्याद्वारे प्रबोधन करून प्रशिक्षण केंद्र स्थापन करून व कलावतांना संस्थेतर्फे प्रोत्साहन देणे.

१४) गोर गरीब गरजूंना वैद्यकीय मदत करणे, रूग्णांना रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करणे. त्यासाठी धर्मार्थ दवाखाने स्थापन करणे व कॅन्सर, एड्स, टी. बी. रोगाबाबत वैद्यकीय शिबिरे तसेच नेत्रदान, रक्तदान शिबिरे आयोजित करून त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य मदत करणे व त्याबाबत मार्गदर्शन करून त्यांची समस्या सोडविणे.

१५) निरनिराळे राष्ट्रीय सण थोर पुरूषांच्या जयंत्या, पुण्यतिथी, सार्वजनिक गणेश उत्सव,  सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरे करणे, त्याद्वारे लोकसंघटन लोक प्रबोधन करणे

१६) मंडळामार्फत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वहया - पुस्तके तसेच शालोपयोगी लेखन सामग्री तसेच त्यांना आर्थिक शैक्षणिक मदत करणे.

१७) राष्ट्रीय सण साजरे करणे तसेच थोर पुरूषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या करणे.

१८) क्रिडा विषयक कार्यक्रम, मुलांच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन देणे.

१९) क्रिडा विषयक कार्यक्रम, मुलांच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास योजना राबविणे, व त्यामध्ये वैविध्यता आणि संशोधनास प्रोत्साहन देणे.

२०) नैसर्गिक आपत्तीमध्ये अन्न, वस्त्र व निवारा या गोष्टी आपदग्रस्तांना पुरवणे तसेच शकय तितकी आर्थिक मदत आपदग्रस्तांपर्यत पोहोचवणे.

२१) समाजातील दीन दुबळया लोकांवर झालेल्या अन्यायाविरुदध झटुन त्यांना न्याय्य मिळवुन देणे.

२२) विकसित शेतीची वैज्ञानिक तंत्र आणि माहिती ग्रामीण शेतकऱ्यांपर्यत पोहोचवुन त्यांच्या हितांचे कार्यक्रम गाव पातळीवर राबवणे.

२३) कोणत्याही राजकिय पक्षाचे वा आक्रमक संघटनेचे समर्थन न करता व त्यांच्याकडुन मदत न घेता वरील उददीष्टे साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे.