नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 
 

शिवरायांच्या विचारांनी चालणं नसेल तर...

जय शिवराय म्हणुन काय उपयोग?

शंभु चरित्राला न्याय नसेल तर...

कपाळावर भगवा गंध लावुन काय उपयोग?

परस्त्री मातेसमान मानणार नसाल तर...

घरात जिजाऊंचा फोटो लावुन काय उपयोग?

तोंडातल्या गुटखा-तंबाखुचे व्यसन सुटत नसेल तर...

बोटात राजमुद्रेच्या अंगठया घालुन काय उपयोग?

आपापसांतील वाद मिटवणार नसाल तर..

गाडयांवर शिवरायांचे फोटो लावुन काय उपयोग?

अन्याया विरूध्द तुमचा आवाज उठत नसेल तर...

महापुरूषांचा इतिहास वाचून काय उपयोग?

समाजातील गरजुंना मदत नसेल तर... तुमच्या "शिवभक्त" असण्याला काय उपयोग..

-: शिवशभोंच्या विचारांचे पाईक व्हा भावडांनो :-

!! जय शिवराय!!