नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 
:- पुढील मोहीम -:
 
 
     
     
 
 

इतिहास बोललं की आम्हांला आठवतात छत्रपती शिवराय आणि धर्मवीर शंभूराजे यांचे कर्तृत्व अंगावर शहारे आणणारे. गर्वाने छाती फुगवून बोलावसं वाटंत "देवा धन्य झाला जन्म या मातीत मी जन्मलो".   या मातीमध्ये जन्म घेऊन छत्रपती शिवशंभो आम्हांला समजले पण.....आमच्या विचारातून आणि  कृतीतून ते उतरले का याचा विचार शिवभक्त व शिवप्रेमींनी करायला हवा.

जगाच्या पाठिवरील सर्वश्रेष्ठ राजाच्या सर्वश्रेष्ठ इतिहासाचा वारसा कसा आणि कोणत्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न करतो आम्ही आणि भविष्यात येणारा पिढीला आम्ही कोणता इतिहास सांगितला जाईल याचेही भान आम्ही ठेवायला हवे. अशीच शिवशंभो आणि मातीसाठी निष्ठावंत असणारी माणसं जी आपली निष्ठा फक्त FACEBOOK, WHATS APP आणि देखावा पुरती मर्यादीत न ठेवता "मावळा प्रतिष्ठान" परिवाराच्या माध्यमातून भगव्यासाठी एक होवून एक विचार, एक ध्येय, एक निष्ठा या तत्वांवर शिवकार्यातून समाजकार्य आणि समाजकार्यातून शिवकार्य करण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलण्याचा निस्वार्थी प्रयत्न करून भरकटलेला इतिहास अनेक माध्यमातून तळागाळातील लोकांना पर्यंत पोहचवण्याचा हा अट्टाहास.

आपणही जर शिवशाहीचे विचारांचे पाईक असाल आणि आपली निष्ठा कृतीत उतरवायची असेल तर हजारोंच्या  संख्येने सहभागी व्हा शेवटी फक्त ऐवढच बोलावसं वाटंत "उठ मावळ्या पेटू दे रक्त मराठी जागा हो गड्या लढ या मातीसाठी"