नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 
-: शरद पोंक्षे सरांची भेट - २०१९ :-
 
 
 
 
 

शरद पोंक्षे सरांच्या आजाराबद्दल काही दिवसांपूर्वी वाचल दुःख झाले, आणि भेटायची प्रखर इच्छा झाली.कर्करोगाने आजपर्यंत खूप जणांना त्रास दिला आहे. मात्र आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी कमी कालावधीमध्ये ही लढाई जिंकून आपल्या सकारात्मक आयुष्याचं उदाहरणंच दिल...सर आज आपल्याला भेटून आणि आपला उत्साह, सावरकर, हिंदुत्वा विषयीची आपली तळमळ आपल्या बोलण्यात आजही स्पष्ट जाणवली. आमच भाग्य थोर जे आपल्या काही क्षणांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभले..

आजपर्यंत आपण सावरकरांचे विचार समाजापर्यंत पोहचविले आहेत त्यामुळे तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. कायमच आपल्या पाठीशी सर्व रसिकप्रेक्षक आणि खुद्द सावरकरांचे आशीर्वाद आहेत. आपण पुन्हा एकदा लवकरच रंगमंचाचा ताबा घ्यावात आणि आपल्या वक्तृत्वाने कायमच रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत राहावे ह्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

सचिन जाधव
संस्थापक अध्यक्ष
मावळा परिवार महाराष्ट्र राज्य

 
 
 
s