नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 

-: शैक्षणिक साहित्य वाटप २०१९ - माडगणी ता. वाई. जि.सातारा. :-

शिक्षण हे माणसाला माणसात आणण्याच महत्त्वाचे साधन आहे. त्याला अनुसरुन मावळा परिवाराने वाई तालुक्यातील माडगणी गावात [ निसर्गाच्या सानिध्यात डोंगरावर वसलेला हे गाव हिते फक्त चालतच जाता येत ] येथील मुलांना शैक्षणिक साहित्य,sport Dress,Sport shoes,computer,Printer वाटप करण्यात आले. ही सर्व मुलं नक्किच यशाचे उत्तुंग शिखर गाठतील आणि यांच्या या प्रवासात मावळा परिवार सदैव त्यांच्या पाठिशी सहयाद्रिसारखा उभा राहिल दिनांक 6 ऑक्टोबर ची शालेय साहित्य वाटप मोहिम खरंच अविस्मरणीय आणि थरारक अनुभव देणारी होती. 15km चा डोंगर भर उन्हात सर्व साहित्य घेवून चढल्यानंतर माझ्या सोबतच सर्वजण खुपच थकले होते.पण माडगणी गावात पोहचताच गावातील सर्व ग्रामस्थ,वयोवृद्ध,महिला भगिनी, शाळेतील सर्व मुलांनी ज्या पद्धतीने आमच स्वागत केलं.आम्ही सर्व यांच्या सन्मानाने खरंच भारावून गेलो.एका अनोळखी माणसांसाठी अतिथी देवो भवच प्रत्यक्ष उदाहरणं माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच अनुभवल नव्हत.

सर्वांच्या चेहरावरील निरागस आनंद पाहून आमचा थकवा कुठल्या कुठे नाहीसा होवून सर्वांच्या कष्टाची पावती भेटल्याच समाधान शब्दात मांडता येण शक्य नाही.पण काही क्षण सर्वच जण भारावून जावून एक वेगळंच भावनिक नातं वातावरण निर्माण झालं होतं.शिक्षणाची पलिकडे पालक होवून मुलांच्या गरजेच्या वस्तूसाठी निस्वार्थ भावनेने झटणारा बाप माणूस मोरे गुरुजी.

माणसाची माणूसकी त्याचा सर्वात मोठा सद्गुण आहे आज माडगणीने आम्हांला याची जाणीव करून दिली.