नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 

-: आदिवासी महिलांसोबत साजरा केला भव्य भाऊबीज सोहळा २०१९ :-

प्रगत अश्या एकविसाव्या शतकाच्या सुध्दा समाजातील अनेक घटक मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. अशा दुर्लक्षित समाजासाठी दिवाळी सारख्या महत्वाच्या सणाला आठवण करुन त्यांच्या वस्त्या व पाड्यांवर जावून दिवाळी-भाऊबिज सारखे सण जेव्हा साजरे करतात तेव्हा वेगळा आदर्श निर्माण होत असतो.

मावळा प्रतिष्ठान च्या माध्यमातून आज दिपावली भावा - बहिणी मधील प्रेम आणि नातेसंबंध अधिक दृढ करणारी अनोखी भाऊबीज. सारसून दादरकोपरा, जव्हार ५०० ते ७०० महिलांना साड्या वाटप आणि लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

मावळा परिवाराच्या नेतृत्वाखाली दुर्लक्षित घटकांसाठी एक आगळी वेगळी अशी अनोखी भाऊबीज साजरी करण्यात आली. त्यावेळी मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन भाऊ जाधव आणि सरचिटणीस रमाकांत भाऊ बने, महेंद्र जाधव यांच्या सोबत पालघर विभाग अध्यक्ष शशांक भाऊ तांडेल, पालघर जिल्हा सचिव सिद्धेश भाऊ भणगे, स्वप्निल भाऊ बने, सुशील जाधव, सर्वेश परब, यांच्या सहभाग होता.

या गावातील महिलांनी आम्हा सर्वाना परंपरागत पध्दतीने ओवाळले. यावेळी आदिवासी महिलांच्या चेहर्‍यावर आणि लहान मुलांचे हास्य फुलले होते आणि एक वेगळा भाव त्यांच्या चेहर्‍यावर जाणवत होता.बिकट
परिस्थितीही आनंदी कस राहावं हेच आज या निरागस माणसांनी आम्हा
आयुष्याचा एक नवीन धडा शिकवल.

*Facebook Page* :
https : //m.facebook.com/mavala.in
*website* : www.Mavala.in
*मुंबई/1392/मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य (रजि )*