नमस्कार, "मावळा प्रतिष्ठान"च्या या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!
 
 

-: पुरणपोळी नियोजन ( वात्सल्य ट्रस्ट सानपाडा )२०१७ :-

 

हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यावेळेस नवीन वर्षाची सुरूवात सानपाड्यातील वात्सल्य ट्रस्टमधील 36 मुली आणि 20 वयोवृद्धासोबत साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षी आपण सर्व नवीन वर्ष आपल्या कुटूंबा सोबत मोठ्या आनंदाने साजरा करतो चला या वर्षी आपण काही क्षण अशा लोकांसोबत साजरा करू ज्याना आपल्या सहवासाची,प्रेमाची,आपूलकीची गरज आहे.आपले काही क्षण या निरागस आणि वयोवृद्ध लोकांच्या चेहरावर काही वेळासाठी आनंद आणि समाधान आणू शकतो.

पुरणपोळी,दुध,कचोरी,वेफर्स,फ्रूटी या मुलांच्या पंगतीत बसून चला आपण सर्व प्रेम,आपुलकी,आधार,समाधानाची गुढी उभारू या निरागस मुलांन सोबत

ठिकाण : वात्सल्य ट्रस्ट सानपाडा नवी मुंबई

वात्सल्य ट्रस्ट सानपाडा
Plot No 11, sanpada FLyover,sector 2,sanpada,Navi Mumbai

ट्रस्टच्या सदस्य संख्या
मुली : 36 ( वय 6 वर्ष ते 20 वर्षापर्यंत)
वयोवृद्ध : 20 ( वय 40 ते 80 वर्षापर्यंत )